बाणेर :
बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोड आणि प्राईड प्लॅटिनम सोसायटी परिसरातील रस्त्याचे काम पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून होत असून या रस्त्याच्या कामाची पाहणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी करत रस्त्याचे काम व परिसरातील इतर समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.
पॅनकार्ड क्लब रोड आणि प्राईड प्लॅटिनम सोसायटी परिसरात रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते योग्य रित्या व्हावे म्हणून पाहणी केली. यावेळी त्या परिसरात राडारोडा आणि कचरा पडलेला असल्याने तसेच साठलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ महापालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करत राडारोडा, कचरा आणि पाण्याचा निचरा करावा अशा सूचना केल्या. स्थानिक नागरिक पूर्ण सहकार्य करत असल्याने नागरी समस्या तात्काळ मार्गी लागत आहेत : समीर चांदेरे(युवक अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)



More Stories
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान
*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*