औंध :
अतिवृष्टी मुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रात असलेल्या नदी लगतच्या बालेवाडी, बाणेर, चंद्रमणी संघ औंध रोड व बोपोडी भागातील वस्त्या व गावांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरून कोणतीही हानी होऊ नये याकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग व अभियंता विभाग तत्पर कार्यरत आहे.
तसेच शासनाकडून देखील औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय भागात कोणतीही हानी जीवितहानी किंवा वित्त हानी होऊ नये याकरिता NDRF ची 30 जवांनांची टीम मदतीसाठी पाठविण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने औंध बाणेर भागातील बाधित क्षेत्रात नागरिकांच्या सोयीकरिता केलेल्या कामकाजाचे नियोजन पाहणी करण्याकरिता मा. उप आयुक्त श्री. महेश पाटील, मा. महापालिका सहा. आयुक्त श्री. गिरीष दापकेकर, NDRF कॅप्टन श्री. चंद्रकेतू शर्मा, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, उप अभियंता दीपक लांडे, अभियंता भागवत यांनी रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण कार्यक्षेत्राची पहाणी केली.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..