April 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

१० वी व १२ वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन मानवतकर यांच्याकडून कौतुकाची थाप..

औंध :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली औंध प्रभागातील १० वी व १२ वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक कौतुकाची थाप म्हणुन गुण-गौरव समारंभ व करीयर मार्गदर्शन शिबीर सचिन मानवतकर मित्र परिवार तर्फे आयोजित करण्यात होते.

 

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, अतिशय कष्टाने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप पाठीवर देणे महत्वाचे असते. जेणे करुन त्यांच्यामध्ये उत्साह वाढून लढण्याची जिद्द निर्माण होईल. हे असे महत्वाचे काम सचिन मानवतकर आणि मित्रपरिवार यांनी केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे नागरिकांसाठी विविध प्रकारचे महत्वाचे उपक्रम राबवत सचिन मानवतकर चांगले काम करत आहे.

सचिन मानवतकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करत मुलांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे.मा.मनोहर भोळे सर. मा.चिंतामणी सर-(पोलीस निरीक्षक).मा.सुनिल पांडे. मा.सचिन वाडेकर. मा.बाबा तारे मा.मनोजभाऊ ठोसर. मा.जुनेदभाऊ. रितेश घडसिंग, मयुर ताम्हाणे, मयुर भांडे, राम मंडलिक, सचिन मानवतकर मित्र परिवार व प्रभागातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.