July 27, 2024

Samrajya Ladha

आयटीआय मध्ये कौशल्य प्रशिक्षण घेऊन करिअर करण्याची विद्यार्थ्यांना संधी : मंगल प्रभात लोढा

औंध :

दिनांक 10 जून 2024 रोजी दुपारी 1.00 ते सायंकाळी 5.00 दरम्यान औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे च्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे पार पडले.सदर कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय श्री.मंगल प्रभात लोढा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

 

या उद्घाटनानंतर बोलताना श्री.मंगल प्रभात लोढा म्हणाले की, तरुण पिढीने कौशल्य आत्मसात करून जर्मनी, जपान यासारख्या देशात जाण्याची संधी मिळवावी. तसेच स्वतःचं करिअर कौशल्य प्रशिक्षण घेऊन आयटीआय मध्ये करता येऊ शकते’.

श्री. आर.बी भावसार उपसंचालक, औंध.आय.टी आय. तथा सहसंचालक व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण, पुणे विभाग lयांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्यात 288 विधानसभा मतदार संघात हे करिअर शिबिर आयोजित करण्यात येत असून सध्या ज्या विधानसभा मतदार क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू नाही तेथे 10 जून 2024 ते 22 जून 2024 पर्यंत आयोजित करण्यात येत असून हा राज्यातील पहिला कार्यक्रम आहे असे श्री.भावसार यांनी प्रास्ताविकात नमूद केले.

यानंतर शिवाजीनगर विधानसभा सदस्य आमदार माननीय श्री.सिद्धार्थ शिरोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःचे करिअर कशा पद्धतीने घडले हे सांगताना आपल्या आवडीनिवडी जपून विद्यार्थ्यांनी करिअर घडवावे असे नमूद केले.

करियर मार्गदर्शन करताना दीप फाउंडेशनचे संस्थापक माननीय श्री.यजुर्वेंद्र महाजन, संस्थापक अध्यक्ष दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण तज्ञमहाजन यांनी सांगितले की, करियर निवडताना येणारे अडथळे, अज्ञानपण हे दूर करण्यासाठी व परिस्थिती कोणतीही असताना त्याचा बाऊ न करता आपल्या आवडीचे करिअर विचारपूर्वक निवडावे व निवडल्यानंतर ते योग्य पद्धतीने तडीस न्यावे यासाठी संघर्ष, संयम व सातत्य या तिन्ही गुणांचं संगम निर्माण करावा असे नमूद केले .

यानंतर डिप्लोमा बाबत दहावी बारावी व आयटीआय नंतर पॉलिटेक्निक मध्ये कोणकोणते कोर्सेस करता येऊ शकतात व त्याला लागणारा कालावधी, कागदपत्र आणि पॉलिटेक्निकची संपूर्ण माहिती प्राध्यापक काळे यांनी दिली.

महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटीचे माननीय सौ. श्रुती जोशी यांनी त्यांच्याकडील योजना व विद्यार्थ्याप्रती असलेल्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक माननीय श्री. दिगांबर दळवी साहेब हे होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्ष भाषणावेळी आयटीआय विषयी आयटीआय मधील योजनांविषयी, आयटीआय मधील प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येत असलेल्या विद्यावेतनाबाबत बोलताना येत्या काही दिवसांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये दर महिना पाचशे रुपये प्रमाणे विद्यावेतन जमा करण्यात येणार आहे. तसेच जपान आणि जर्मनी या ठिकाणी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकरिता मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत परंतु तेथे जाण्यासाठी जर्मन आणि जपान ची भाषा शिकणे आवश्यक आहे. याबाबत आयटीआयमध्ये मुंबई विभागामध्ये या भाषा शिकविले जात आहेत, जेणेकरून आयटीआय उत्तीर्ण झाल्या नंतर त्यांना विदेशात जाऊन काम करून आपल्या देशामध्ये डॉलर आणता येऊ शकेल. असे नमूद करून पुढील वाटचालीस सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध,पुणेचे उपसंचालक तथा सहसंचालक माननीय श्री भावसार साहेब,माननीय श्री.निखिल नानगुडे साहेब,विशेष कार्य अधिकारी मंत्री कार्यालय, माननीय श्री.चंद्रशेखर ढेकणे साहेब,माननीय श्री.चींधे साहेब निरीक्षक,उबाळे साहेब निरीक्षक,कोळेकर साहेब टेक्निकल हायस्कूलचे मुख्याध्यापक सोमनाथ पुरी साहेब, पुणे जिल्यातील विविध संस्थांचे प्राचार्य आदी मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते.तसेच या सभागृहाची कॅपॅसिटी पाचशेसाठची असून सदर हॉल पूर्ण क्षमतेने भरला होता.औंध आयटीआय मधील सर्व अधिकारी कर्मचारी व पत्रकार हे देखील उपस्थित होते.सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री.शशिकांत पेडवाल,सौ. प्रियांका वाघमारे,सौ.परदेशी यांनी केले व उपस्थितांचे व सर्व मान्यवरांचे आभार संस्थेचे उपप्राचार्य माननीय श्री.भिलेगावकर यांनी मानले.

 

You may have missed