बालेवाडी :
Lनुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसी(CBSC)10 वी च्या निकालानुसार श्री खंडेराय प्रतिष्ठान, बालेवाडीच्या सी एम इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल नोंदवीला असून शाळेतील अमेय पांगा आणि काव्या बाफना यांना 95% तर अवनीश जोशी -94.6%, अक्षभ्या सप्रे आणि ओम कथार यांना 93.6% टक्के असे गुण प्राप्त झाले.
सदर विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध खेळ, कला प्रकार आणि अभ्यासाचे वेळापत्रक यांची सांगड घालून देण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि प्राचार्या इक्बाल कौर राणा यांनी मार्गदर्शन केले.
ह्या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर आणि संस्थेचे सचिव डॉ सागर बालवडकर यांनी विदयार्थ्यांचे आणि सर्व शिक्षक वृंदाचे कौतुक केले.
उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य मार्गाने आयुष्य जगण्यास मदत करते आणि अभ्यासाबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धा परीक्षा आणि शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढविण्याकरिता खेळ आणि विविध कला प्रकाराकडे तेवढेच लक्ष दिले पाहिजे असे सचिव डॉ सागर यांनी नमूद केले.
More Stories
बाणेर येथे ज्योती कळमकर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग मार्गदर्शनाचे आयोजन
सोमेश्वरवाडीत चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
मतदार नोंदणी अभियान: बाणेरमध्ये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सौ पुनम विशाल विधाते यांचा पुढाकार..