May 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील कंम्फर्ड झोन सोसायटीत मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली नमो संवाद सभा.

बालेवाडी :

प्रभाग क्रमांक 9 बाणेर, बालेवाडी, सानेवाडी येथिल  नागरिकांसाठी ‘नमो संवाद’ सभा कंम्फर्ड झोन सोसायटीत आयोजित करण्यात आली. यावेळी 150 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.

 

नमो संवाद सभेच्या माध्यमातून यावेळी नागरिकांशी मुक्त संवाद साधण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केले पाहिजे याबाबत जनजागृती करण्यात आली. पुणे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विकास कामे मार्गी लावण्यासाठी निवडून दिले पाहिजे हे पटवून देण्यात आले

या सभेला माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, चिटणीस लहू बालवडकर व विकास कामत साहेब यांनी खूप छान मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा कोथरुड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रकाश बालवडकर, भाजपा ओबीसी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ व अरविंद सिंग उपस्थित होते.