September 17, 2024

Samrajya Ladha

पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा !!!

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या बावधन, सुस, पौड, पिरंगुट, कोळवण, माले या सर्व शाखेत आज दि.1मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्व शाखांमध्ये ध्वजरोहण करण्यात आले. यावेळी बावधन शाखेत शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांच्या हस्ते तर सुस शाखेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पौड -पिरंगुट माले व कोळवण या शाखांमध्ये मुख्याध्यापक अभिजित टकले यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण करण्यात आले. सर्व शाखांमध्ये महाराष्ट्राच्या भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण करून महाराष्ट्राची आन बान व शान जपून गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीताचा जयजयकार करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर दुमदूमला होता.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामगारदिनानिमित्त संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र देशा पवित्र देशा…. मंगल देशा… अशा विविध गुणांनी नाटलेल्या या महाराष्ट्राचा सर्वांनाच अभिमान असला पाहिजे असे सांगून या महाराष्ट्राच्या मातीचे सगळ्यावर खूप ऋण आहेत व हे ऋण फेडायचे असतील तर या मातीचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. या महाराष्ट्राच्या मातीला संत भूमी म्हंटले जाते असे सांगून या मातीत आपण जन्म घेतला याचा अभिमान प्रत्येकाने बाळगायला हवा असा प्मोलाचा संदेश संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी सर्व उपस्थितांना दिला.

शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल आदी मान्यवारांच्या उपस्थितीत सर्व शखांच्या मुख्याध्यापकांसमवेत सर्व पर्यवेक्षक व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचा झेंडा फडकवण्यात आला.

आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्वांना महाराष्ट्र राज्याची थोडक्यात माहिती देऊन सर्वात जास्त रोजगाराच्या संधी या महाराष्ट्रात असल्याने आजचा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्याचा जणू हा एक योगायोगच आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा राजेंद्र बांदल सर यांनी सर्वांना दिला .

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित, डॉ.अभिजीत टकले तसेच स्वाती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख सचिन खोडके, पूनम पांढरे, नेहा माळवदे, सना इनामदार, इंदू पाटील, कल्याणी तसेच पल्लवी नारखेडे, यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आले होते.