म्हाळुंगे :
सुस आणि म्हाळुंगे येथील नागरिकांचा बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारा साठी संवाद मेळावा बंटारा भवन मध्ये संपन्न झाला. नागरिकांच्या प्रचंड प्रतिसाद या संवाद मेळाव्यात दिसून आला.
अतिशय कमी वेळात देखील उत्तम नियोजन केल्याचे या प्रचंड गर्दीने सिद्ध केले. त्यातून महायुतीचे परिसरात असणारे भक्कम नेटवर्क दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आणि मला खासदार करायचे याची ग्वाही देत या दोन्ही गावातील नागरिकांनी एकजुटीची वज्रमुठ उगारली, एक भक्कम आत्मविश्वास या संवाद मेळाव्याच्या निमित्त प्राप्त झाला : सुनेत्रा अजित पवार( उमेदवार बारामती लोकसभा)
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, राजाभाऊ हगवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, सुनिल चांदेरे, अंकुश मोरे, दीपक करंजावणे, गोविंद निकाळजे, राजाभाऊ वाघ, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, धनंजय टेमघेरे, भाऊ आखाडे, समीर चांदेरे, राहुल बालवडकर यांच्यासह सुस व म्हाळुंगे परिसरातील नागरिक, पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी माझ्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. सन्मान करण्यात आला.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..