औंध :
औंध डि.पी.रोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अजय कुलकर्णी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्शिगी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमात भारताचे संविधान व डॉ.बाबासाहेब लिखित पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारताचे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे बहुजन उध्दारक सामाजिक संस्थेच्या व जयंती महोत्सव समितीच्या वतीने वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन बहुजन उध्दारक सामाजिक संस्था व रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर नेते रमेश ठोसर यांनी केले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. शाफिल पठाण पोलीस निरीक्षक, चतुर्शिगी वाहतूक विभाग पुणे शहर, युवराज नांद्रे पोलीस निरीक्षक, दिनेश गडांकूश, रोहन जावीर, मा. नगरसेवक कैलास गायकवाड, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा नेते लहू बालवडकर, काँग्रेस ओबीसी नेते जीवन चाकणकर, शिवसेना (उबाठा) नाना वाळके, सुप्रीम चींधे, पै.निलेश ठोसर , योगेश भोसले, महादेव साळवे, अजय निरवणे, दिनेश ठोसर इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..