May 25, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील सकल मराठा समाज मराठा सहाय्यक समिती कार्यालयाचे उद्घाटन क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न..

बाणेर :

बाणेर येथिल सर्वे नंबर ६३ मध्ये सकल मराठा समाज मराठा सहाय्यक समिती कार्यालयाचे उद्घाटन क्रांती सूर्य, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, महाळुंगे, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरातील मराठा बांधवांनी एकत्र येत सकल मराठा समाजातील सुशिक्षित युवकांना विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक साहाय्य या कार्यालयामार्फत कऱण्यात येणार आहे.

 

यावेळी बोलताना क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बाणेर परीसरात मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यालय सूरु केले हि आनंदाची बाब आहे. मराठा समाजाचे प्रश्न प्रामाणिक पणे सोडविले जावेत यासाठी माझा प्रयत्न आहे. लवकरच आपला आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी आंदोलन उभे करणार आहोत. त्यासाठी आसपास गावागावात फिरून बैठका घेत समाज एकत्र करा.

यावेळी प्रकाश बालवडकर, अजिंक्य सुतार, नाना वाळके, प्रकाश तापकीर, योगेश जुनवणे, योगेश सुतार, महेश सुतार, केदार कदम, मधुकर निम्हण, रणजीत कलापुरे, गिरीश जुनवणे, राहुल गायकवाड, शाम बालवडकर, संतोष तापकीर, जनार्दन मुरकुटे, संजय मुरकुटे, संग्राम मुरकुटे, जयेश मुरकुटे, भरत जोरे, नारायण सुतार, हेरंब कलापुरे, छायाताई रणपिसे, शोभाताई वाघरळ, स्वाती रणपिसे, रोहिणी सुतार, उज्वला जाधव, गणेश मोरे, गणेश सुतार, सागर सुतार, प्रल्हाद गोळे, सुरेश खेडेकर, संदीप सुतार, संदिप बालवडकर आदी उपस्थित होते.