बालेवाडी :
बालेवाडी येथील कै. बाबुराव गेणूजी उर्फ शेटजी बालवडकर म.न.पा. शाळेच्या नवीन वर्ग खोल्या व सांस्कृतिक हॉलच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश बालवडकर यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण केले होते. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे येणाऱ्या पुढील काळात विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था होणार आहे.
शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून देखिल त्यांना बसण्यास पूरेशी व्यवस्था नव्हती. नविन वर्ग खोल्या झाल्यानंतर त्यांची अडचण दूर होईल हि आनंदाची बाब आहे. भविष्यात देखिल विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे : प्रकाश बालवडकर( उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना)
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, दिलीप बालवडकर हनुमंत बालवडकर, ज्ञानेश्वर बालवडकर, संदीप बालवडकर, नरेंद्र बालवडकर, आनंदा कांबळे, अशोक बालवडकर, श्याम बालवडकर, मुख्याध्यापिका कल्पना बाबर, मुख्याध्यापिका सुजाता वाघमारे उपस्थित होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..