बाणेर :
बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्री भैरवनाथ सन्मान व गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात बाणेर येथील कुंदन गार्डन कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. संस्थेच्या माध्यमातून आर्थिक विकासासोबत सामाजिक कार्याची परंपरा जपली जात असल्याचे प्रतिपादन आमदार शंकर मांडेकर यांनी केले.
यावेळी माजी आमदार शरद ढमाले, डॉ. दिलीप मुरकुटे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका मयुरी कोकाटे, ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, प्रकाश बालवडकर, शांताराम पाडाळे, गोविंद रणपिसे, लहू बालवडकर, नामदेव गोलांडे, हनुमंत सायकर, पांडुरंग दातार, मारुती कोकाटे, राम गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दिलीप मुरकुटे म्हणाले, “बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजवरच्या यशामध्ये संस्थेचे संचालक, कर्मचारी, सभासद आणि ठेवीदार यांचा मोठा वाटा आहे. संस्थेने आतापर्यंतचा संघर्ष आणि वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली असून, भविष्यातही आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवला जाईल.”
माजी आमदार शरद ढमाले यांनी सांगितले की, माणसाचा वैचारिक विकास घडविण्यासाठी अध्यात्माची गरज असते, तर सत्कार आणि गौरवाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळते. बाणेर नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने ॲड. शिवराज कदम, सुभाष हगवणे, सोपानराव बालवडकर, रखमाजी पाडाळे, हनुमंत सोनवणे, गणेश शेडगे, विराज रानवडे, योगेश धनकुंडे, गहिनीनाथ कळमकर आणि समीर गायकवाड यांना ‘भैरवनाथ पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश किसन बालवडकर, देहूगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष योगेश काळोखे आणि दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या उपाध्यक्ष वर्षा पांडुरंग थोरवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनीही मनोगत व्यक्त केले. वर्धापन दिनानिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची विशेष जोड मिळाली.
कार्यक्रमास पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद आणि ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























More Stories
*नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता* *पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा*
वाढदिवसाच्या आनंदाला पर्यावरण संवर्धनाची जोड; तुकाई टेकडीवर राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा स्तुत्य वृक्षारोपण उपक्रम
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा