पिरंगुट :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे गुरुपौर्णिमा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व गुरु वंदना गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, भारतीय संस्कृतीतील गुरुंचे स्थान आणि गुरु-शिष्य परंपरेची माहिती प्रभावीपणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मनोगते सादर केली. उपस्थित सर्वांनी गुरुंचा सन्मान करण्याचा व त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा संकल्प केला.
हा कार्यक्रम चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर , संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम, संचालिका कु. शिवानी बांदल आणि सर्व शाखा प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
मुख्याध्यापिका सौ.इनायत मुजावर यांनी मनोगतातून “गुरु हे ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्यांचे दीपस्तंभ आहेत”, असे सांगत विद्यार्थ्यांना आपल्या गुरुंचा आदर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उज्ज्वल भविष्य घडवावे, असा प्रेरणादायी संदेश दिला.
संपूर्ण कार्यक्रम प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर मॅडम यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे मॅडम, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार मॅडम आणि माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रुपाली गर्ग मॅडम यांच्या सहकार्याने सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित सर्वांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना वंदन केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदर, संस्कार आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ करणारा ठरला.




























More Stories
*तायक्वांदोच्या ‘इंडिपेंडन्स कप’मध्ये पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी*
देशाचा सन्मान जिथे, भाजपचा सहभाग तिथे!; तिरंगा रॅलीत कोथरूड मतदारसंघातूनही मधून हजारों नागरिकांचा सहभाग — अनिकेत चांदेरे
*स्व. विनायक आबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त खडकी पोलीस स्टेशनला संगणकीय साहित्याचे वितरण*