पुणे :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सूस येथे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली “AI Tools and AI Integration in Classroom Management for Teachers” ही विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बदलत्या शैक्षणिक युगाशी सुसंगत राहून शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्याचा प्रभावी वापर अध्यापनात करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या प्रशिक्षणासाठी प्रख्यात संशोधक, वैज्ञानिक आणि आंतरराष्ट्रीय वक्ते डॉ. प्रतीक मुंडगेकर (FRSA) व कल्पेश जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत संकल्पना, शैक्षणिक क्षेत्रातील AI चे महत्त्व, स्मार्ट वर्गव्यवस्थापन, अध्यापन साहित्य निर्मिती, मूल्यमापन प्रक्रिया, संशोधन, सादरीकरण कौशल्ये तसेच विद्यार्थीकेंद्रित शिक्षणामध्ये AI चा प्रभावी वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ व्याख्यानापुरती मर्यादित न राहता शिक्षकांना विविध AI साधनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, हँड्स-ऑन प्रशिक्षण, गटचर्चा, केस स्टडी आणि प्रत्यक्ष उपयोजनाचा अनुभव देण्यात आला. शिक्षकांनी AI आधारित लेसन प्लॅनिंग, प्रश्नपत्रिका निर्मिती, मूल्यांकन, प्रेझेंटेशन डिझाइन, कंटेंट क्रिएशन आणि उत्पादकता वाढविणाऱ्या विविध साधनांचा वापर प्रत्यक्ष करून पाहिला.
सूस ,पौड, कोळवण आणि माले शाखांतील शिक्षकांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. मुंडगेकर यांनी समाधानकारक उत्तरे देत AI चा जबाबदारीने आणि नैतिकतेने वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांसाठी अधिक परिणामकारक आणि प्रेरणादायी शिक्षण वातावरण निर्माण करण्याचे आवाहन पेलण्यासाठी सज्ज करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते. शिक्षणातील नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचे मत सर्व शिक्षकांनी व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर यांनी या प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला नवी दिशा मिळेल तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत अधिक गुणवत्ता आणि नाविन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या संपूर्ण AI प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन हे पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल तसेच शाळेच्या मुख्य प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सूस शाळेच्या उपमुख्याध्यापक योगिता ढाणे , विभागप्रमुख सचिन खोडके, समन्वयक नेहा माळवदे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले.
*कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात शिक्षकांना सक्षम, तंत्रज्ञानस्नेही आणि भविष्याभिमुख बनविणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे पेरिविंकल ग्रुप ऑफ स्कूल ने शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.*



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी