बाणेर :
योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बाणेर चा 30 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे सभासद किरण वाघेरे, योगेश टिंगरे, उद्धव कवडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेच्या कर्मचार्यांना प्रत्येकी 20 हजार शैक्षणिक अनुदान संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
संस्थेेचे संस्थापक, अध्यक्ष माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या मनोगतात त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेच्या दोन शाखा असून ठेवी 162 कोटी, कर्ज 130 कोटी, एकत्रित व्यवसाय 292 कोटीच्या पुढे झाला आहे तर निव्वळ नफा 4 कोटी 55 लाख रुपये झाला आहे. संस्थेने समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत आपली सेवा पोहोचवली आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. तसेच, आगामी काळात संस्थेच्या विकासासाठी असलेल्या योजनांविषयी माहिती दिली. संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवून गोर गरिबांना मदत करत असते.
भंडारा डोंगरावर उभ्या राहणाऱ्या मंदिरासाठी नागरिकांकडून 11 कोटी रुपये निधी संकलन करण्याचा यावेळी संकल्प केला व संस्थेच्या वतीने यापूर्वी 10 लाख देणगी दिली आहे परंतू यापुढे मंदिराचे काम पूर्ण होई पर्यंत दरवर्षी संस्थेच्या वतीने 5 लाख रुपये देणगी देण्याचे घोषित केले. संस्थेने केलेले सामाजिक कार्य आणि सभासदांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, ज्याला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.
11 कोटी रुपये संकलन करण्याच्या संकल्पात ज्ञानेश्वर तापकीर, हभप संजय बालवडकर, रविंद्र घाटे व गणेश कळमकर यांनी प्रत्येकी 11 लाख रुपये देणगी देण्याचे घोषित केले.
याप्रसंगी सेवानिवृत्त जिल्हा विशेष लेखापरीक्षक चांगदेव पिंगळे, सेवानिवृत्त महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे उप संचालक योगीराज देवकर, गणेश कळमकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अशोक मुरकुटे, राहुल बालवडकर, रामदास मुरकुटे, डॉ. राजेश देशपांडे, यशराज पारखी, ज्ञानेश लोहकरे, ह.भ.प. संजय बालवडकर अनिल बालवडकर, नारायण चांदेरे, दत्तात्रय तापकीर, संग्राम मुरकुटे, जयेश मुरकुटे, सुनिल जाधव, शहाजी रानवडे, दिलीप मुरकुटे, अजय निम्हण, नंदकुमार कोकाटे, गोविंद रणपिसे, राहुल कोकाटे, श्रीकांत पाटील, सुधाकर धनकुडे, राजेश राजेशिर्के, श्रीकांत जाधव, राहुल गायकवाड, प्रमोद बेलसरे, कालिदास मोरे, गणेश ससार, देवीदास मुरकुटे, रामदास विधाते, विजय विधाते, संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, संचालक गणेश तापकीर, संजय बालवडकर, संचालिका रंजना कोलते, अलका सिरसगे, सहयोगी संचालिका निकिता माताडे, माजी संचालक खंडूजी मांडेकर, अशोक रानवडे, वसंत माळी, अमर लोंढे, शाखा समिती सदस्य दत्तात्रय भापकर, प्रदीप नेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे, परिसरातील विविध बँकांचे प्रतिनिधी, तसेच खातेदार व संस्थेचा सर्व स्टाफ उपस्थित होते.
संस्थेचे तज्ञ संचालक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी