औंध :
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस आणि महाळुंगे परिसरात पावसानंतर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याच्या समस्येविरोधात BBPRA टीमने पुढाकार घेतला आहे.
आज प्रभाग ९ चे वॉर्ड ऑफिसर नायकल साहेब यांची भेट घेऊन BBPRA टीमतर्फे या भागातील एकूण ६७ ठिकाणांवरील पाणी साठ्याच्या समस्यांबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनात नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणामांचे गांभीर्य मांडण्यात आले असून, तातडीने उपाययोजना करून संबंधित ठिकाणांची दुरुस्ती व पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, याच निवेदनाची प्रत येत्या दोन दिवसांत प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवकांनाही देण्यात येणार असल्याची माहिती BBPRA टीमकडून देण्यात आली. स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधी यांच्या समन्वयातून या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचेही टीमने स्पष्ट केले.
या वेळी BBPRA टीमचे सदस्य सारंगजी रानडे, राघवेंद्रजी देशपांडे, गोपेंद्रजी पाटसकर, सुहासजी कुलकर्णी, जयंतजी कांत आणि प्राजक्ता देवस्थळी उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी