बाणेर :
रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी वसुंधरा अभियान बाणेर या वृक्षसंवर्धन व पर्यावरण पूरक उपक्रम संस्थेच्या वतीने १४ वे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ महानंद माने प्राचार्य शेतकी महाविद्यालय शिवाजी नगर पुणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत बाणेर पुणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
नगरसेविका रोहिणी चिमटे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोकाटे, लहू बालवडकर, जयेश मुरकुटे, अनिकेत मुरकुटे, प्रवीण शिंदे, मॉर्निंग ग्रुप पाषाणचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी सर्पमित्र गणेश माने यांनी साकारलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले. ज्ञानेश्वर कोटगिरे यांच्याकडून प्रत्येक रक्तदात्यास एक झाड देण्यात आले. तसेच वसुंधरा अभियांकडून पर्यावरण कापडी पिशवी व प्रमाणपत्र देण्यात आले. २२७ रक्तदात्यांपैकी प्रथम रक्तदान करणारे तरुण तर होतेच शिवाय १५ महिलांनी २१२ पुरुषांनी रक्तदान केले.
सन 2006 पासून वसुंधरा अभियान मार्फत तुकाई टेकडीवर वृक्षारोपण व संवर्धन कार्य चालू असून संस्थेने टेकडीवर आत्तापर्यंत 55 हजार पेक्षा अधिक देशी झाडांची लागवड करून संवर्धन केले आहे.
पर्यावरण कार्यासोबत सामाजिक बांधिलकी म्हणून 14 वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करत आहे. जनकल्याण रक्तपेढी मार्फत याचे संकलन केले असून व गरजू रुग्णांना त्याचा उपयोग होईल..


More Stories
ट्रॅकवर खिळे, मैदानात दारूच्या बाटल्या म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम मधे खेळाडूंच्या स्वप्नांचा चुराडा, सराव सोडून मैदान खासगी इव्हेंट साठी उपलब्ध..
बालेवाडीतील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे स्नेहवनमध्ये ‘बालदीपोत्सव ५’ उत्साहात साजरा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील १८० मुलांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित..
*औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!**मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन**नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*