औंधगाव :
औंध येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
औंधगाव विश्वस्त मंडळाने दि. ०३ मे २०२६ ते ०८ मे २०२६ सलग सहा दिवस त्यामध्ये प्रामुख्याने छबिना, कुस्ती आखाडा, औंधगाव विश्वस्त मंडळ व सौ. भक्ती अजित गायकवाड नगरसेविका, सदस्य महिला बाल कल्याण समिती व अभिजित गायकवाड – संस्थापक अध्यक्ष द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम, तसेच सौ. निशा सचिन मानवतकर नगरसेविका, स्थायी समिती सदस्य व औंधगाव विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तनुश्री पुणेकर यांचा डान्स शो, तसेच औंधगाव विश्वस्त मंडळ आयोजित लावण्य मदन मंजिरी लावणी कार्यक्रम, व शेवटच्या दिवशी श्री सनीदादा निम्हण नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित बाळगोपाळांसाठी बालमेळावा असे अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन औंधगाव विश्वस्त मंडळ व औंध कुस्ती केंद्र यांनी केले होते. प्रथम दोन क्रमांकाची बक्षिसे युवा उद्योजक सुशिलशेठ चंद्रकांत बहिरट पाटील व पै. ज्ञानेश्वर रामचंद्र गायकवाड उद्योजक यांसकडून देण्यात आली. पै. बाळू बोडके (कुमार भारत केसरी )यांनी “औंध केसरी” चा ‘किताब पटकावला. यावेळी एकूण ४० कुस्त्या झाल्या.
उत्सव दिनी पहाटे भैरवनाथ महाराज यांचा अभिषेक ॲड. अशोक रानवडे पाटील व कुटुंबीय यांच्या हस्ते झाला. दुपारी एकता महिला, शिवशक्ती महिला, विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन झाले. संध्याकाळी दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांचा पानसुपारी देऊन सन्मान करण्यात आला.
रात्री औंधगाव भजनी मंडळाचे भजन, नगारा वादन, ढोल ताशा पथके, बँडपथक याच्या गजरात व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थ, विश्वस्त, आसामधनी, खांदेकरी व भाविकांच्या उपस्थितीत पालखीची ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली.
याप्रसंगी आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे, उपमाहापौर परशुराम वाडेकर व अनेक आजी-माजी नगरसेवक, मान्यवर , आवर्जून उपस्थित होते.
औंधगाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष राहुल प्र. गायकवाड, सेक्रेटरी गिरीश जुनवणे, खजिनदार हेरंब कलापुरे, विश्वस्त योगेश जुनवणे , महेंद्र जुनवणे, विकास गायकवाड, सागर गायकवाड, सुप्रिम चोंधे, विलास रानवडे, ॲड.सुशिल लोणकर, सोपान राऊत, सल्लागार रणजित कलापुरे, सुनिल गायकवाड, सचिन रानवडे, आनंद जुनवणे, गणेश कलापुरे, राहुल दि. गायकवाड, ज्ञानेश्वर जुनवणे, ॲड. सुनिल गायकवाड, विशाल शिंदे व मान्यवरांसह ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


More Stories
संगीत, सन्मान आणि जल्लोष; ‘पुणे आयडॉल २०२६’ची दिमाखदार सांगता ‘व्हॉईस ऑफ चॉईस’ पुरस्काराने नवल किशोर राम, डॉ. जगदीश हिरेमठ, सपना आनंद छाजेड, प्रशांत भस्मे यांचा सन्मान
वसुंधरा अभियान रक्तदान शिबिरात २२७ रक्तदात्यांचे रक्तदान..
कोथरूडच्या रंगमंचावर नव्या स्वप्नांची ‘नांदी’! चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’चे लोकार्पण