बालेवाडी :
कोथरूडचे आमदार तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष सहकार्यातून बालेवाडी येथील मोझे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी वेस्ट इन्सिनरेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आली. सॅनिटरी वेस्टच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी निपटाऱ्यासाठी उचललेले हे पाऊल विद्यार्थिनींच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.
कोथरूड उत्तर मंडलच्या चिटणीस सौ. स्मृती ताई जैन यांच्या नियोजनातून साकारलेल्या या उपक्रमाप्रसंगी कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष सचिनजी पाषाणकर, नगरसेविका रोहिणीताई चिमटे, माजी शहर सरचिटणीस गणेशजी कळमकर, माजी मंडल अध्यक्ष लहूअण्णा बालवडकर, मंडल सरचिटणीस मोरेश्वरजी बालवडकर, अस्मिता ताई करंदीकर तसेच मृणाल ताई गायकवाड, जागृती ताई विचारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य रत्नराज कुमार जांबी, प्राध्यापिका सीमा शिएकर व विद्यार्थिनींनी या सुविधेबद्दल माननीय दादांचे आभार मानले. हा उपक्रम महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असे देखील नमूद केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी