बालेवाडी :
ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने शनिवार दि. 25/04/2026 रोजी दुपारी 4.00 वा.SKP कॅम्पस बालेवाडी येथे गायन स्पर्धाचें आयोजन केले होते.
यांस्पर्धेत एकूण 27 गायकांनी सहभाग नोंदविला. गायन स्पर्धेचे सूत्र संचलन श्री. प्रफुल्ल धामेचा आणि सौ. रेखा धामेचा यांनी खूप सुंदररित्या केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अशोकराव मुरकुटे, श्री. गणपतराव बालवाडकर आणि श्री. राहुलदादा बालवाडकर उपस्थित होते. या कार्यक्रमात आपल्या 16 सभासद संस्था मधून 150 पेक्षा जास्त श्रोते हजर होते. गाण्याची सुरुवात श्री. दिलीप बोरकर, मुरकुटे गार्डन यांच्या मेरा ज्यूता है जपानी या गाण्याने झाली. या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारची गाणी सादर केली, त्यात गझल, भक्तीगीत, लावण्या सादर करण्यात आल्या. याकार्यक्रमात श्री. अब्दुल बेगमपल्ली यांनी विठ्ठलावर गायलेल्या भक्तीगीताने त्यांना बहुमान मिळवून दिला.
आपल्या महाघांचे सभासद असलेल्या संस्थांच्या प्रमुखांचा योग्य सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दुरून आलेले कोहिनुर ज्येष्ठ नागरिक संघांचे श्री.लाड श्री. रमेश नागटिळक आणि सहकारी, वाकेश्वर पाषाण ज्येष्ठ ना. संघांचे श्री. हरीश पाठक आणि त्यांचे सहकारी, बोपोडी ज्येष्ठ नागरिक संघांचे श्री. मुरकुटे आणि सहकारी उपस्थित होते .
गायन स्पर्धाचें विजेते मानकरी होते :
1. सौं. सुजाता विचारे – प्रथम क्रमांक
2. श्री. सुधीर जोशी द्वितीय क्रमांक
3. श्री. अब्दुल बेगमपाल्ली तृतीय क्रमांक
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम खूप छान संपन्न झाला. विजेत्यांना श्री. अशोक मुरकुटे, श्री. गणपतराव बालवडकर, श्री. हरीश पाठक, उपाध्यक्ष, श्री. सूर्यकांत कलापुरे, सचिव, श्री. शरद जाधव खजिनदार, आणि महासंघाचे अध्यक्ष ऍड. एस. ओ. माशाळकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संचलन श्री. दिलीप फलटणकर यांनी केले.



More Stories
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान