सोमेश्वरवाडी :
खडकी परिसरातील सुकन्या सृष्टी मित्तल हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६.६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. औंध-बोपोडी प्रभागातील खडकी येथील रहिवासी असलेल्या सृष्टीने आपल्या परिश्रमातून विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल नगरसेवक सनी निम्हण यांनी तिचा सन्मान केला.
सृष्टीच्या या यशाबद्दल सनी निम्हण यांच्या “झुंज” निवासस्थानी तिची भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सनी निम्हण यांनी सांगितले की, केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही, तर त्यासोबत कठोर परिश्रम आणि यशाची प्रबळ इच्छा असणे आवश्यक असते. सृष्टीने हे आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत सृष्टी मित्तल हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.


More Stories
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान