पिरंगुट :
पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. या विशेष दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आकर्षक व प्रेरणादायी पोस्टर्स सादर करून आपल्या सर्जनशीलतेची झलक दाखवली. कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवण्यासाठी परशाराम सरांनी सुरेल गीत सादर केले, ज्यामुळे वातावरण भारावून गेले.
तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर करून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. यासोबतच हनुमंत मनेरे सरांनी मार्गदर्शनपर भाषण देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या प्राचार्या सौ. पूनम वर्मा यांनी केले. माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रेश्मा भोसले व सौ. देविका कांबळे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार, तसेच पूर्व-प्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन परशाराम मेलगे व आरती कलशेट्टी यांनी केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. समता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.


More Stories
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान