बाणेर (पुणे) :
येथील London Kids Preschool Baner मध्ये वार्षिक समारंभ व पदवीदान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी किरण गुडदे (अध्यक्षा, राजाभाऊ गुडदे फाउंडेशन) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या निरागस सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते. पदवीदान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी किरण गुडदे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षणासोबतच संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या प्राचार्या अपूर्वा भंडारी यांनी प्रमुख पाहुण्या सौ.किरण संगीत गुडदे यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच उपस्थित पालक, शिक्षक आणि सर्व सहकाऱ्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.



More Stories
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*