बाणेर :
पाषाण–बाणेर लिंक रोड येथे सुरू होणाऱ्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा वाढणार असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी व व्यवस्थापनाच्या समस्यांचा विचार करून नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पुढाकार घेत संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे.
या संदर्भात त्यांनी प्रभाग अधिकारी, पुणे महानगरपालिका तसेच वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून परिस्थितीचा सखोल आढावा घेत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निम्हण यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरात रिक्षा, कॅब व खाजगी वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या व झेरॉक्स दुकाने यामुळे अतिक्रमण वाढण्याचा धोका असून पार्किंग व्यवस्थेच्या अभावामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होऊ शकतात. याशिवाय मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती लक्षात घेता सुरक्षा व शिस्त राखणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाकडे पुढील महत्त्वाच्या उपाययोजनांची मागणी केली आहे: • वाहतूक नियंत्रणासाठी पूर्वनियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करणे • नो-पार्किंग झोन व ड्रॉप-ऑफ पॉईंट निश्चित करणे • स्वतंत्र व सुयोग्य पार्किंग व्यवस्था उभारणे • अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवणे • वाहतूक पोलीस व स्वयंसेवकांची नियुक्ती करणे • महापालिका व वाहतूक विभागाची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करणे
याबाबत बोलताना नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, “नागरिकांना पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून सोयीस्कर सेवा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र त्याचवेळी परिसरात वाहतूक कोंडी व अव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळेत नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांची गैरसोय टाळणे हीच आमची प्राथमिकता आहे.”
या उपक्रमामुळे परिसरातील वाहतूक व सार्वजनिक व्यवस्थापन अधिक सुसूत्र होईल आणि नागरिकांना सुलभ सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.











More Stories
*कारगिलचे शौर्य, राष्ट्रभक्तीचा जागर – पेरिविंकल विद्यालयातील बावधन शाखेत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान*
*कारगिलच्या वीर जवानांच्या शौर्याला पेरीविंकल सूस शाखेतील विद्यार्थ्यांची भावपूर्ण मानवंदना!*
*टाळ-मृदुंगाच्या गजरात पिरंगुट शाखेच्या पेरिविंकल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा*