बालेवाडी :
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बालेवाडी-म्हाळुंगे स्टेडियमसमोरील सर्व्हिस रोडवर सध्या कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य अमोलभैय्या बालवडकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ‘माझा प्रभाग, स्वच्छ प्रभाग’ या उपक्रमांतर्गत त्यांनी केवळ कचरा प्रश्नावरच नाही, तर तिथे राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही भर दिला आहे.
प्रशासनाला तातडीने उपाययोजनांचे आदेश
पाहणी दरम्यान परिसरातील कचऱ्याची बिकट अवस्था पाहून बालवडकर यांनी तत्काळ पुणे महानगरपालिका घनकचरा विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. सपकाळ यांच्याशी संपर्क साधला. साचलेला कचरा तातडीने उचलण्यासाठी जास्तीच्या गाड्या, जेसीबी आणि आवश्यक मशिनरी तैनात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, या ठिकाणी पुन्हा कचरा साचू नये यासाठी पत्रा शेड फेन्सिंग करणे आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये विशेष तरतूद उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधांवर भर
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रत्यक्ष सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी:
• जेवण घेण्यासाठी स्वच्छ स्वतंत्र जागा.
• पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था.
• स्वच्छतागृहाची (Toilet) उपलब्धता.
या सुविधा तातडीने पुरवण्याचे आदेश त्यांनी उपस्थित आरोग्य अधिकारी (DSI) श्री. भोईर व (SI) श्री. उकिर्डे यांना दिले. कर्मचाऱ्यांना कामासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य व सुरक्षा साधने पुरवण्याबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडली.
क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. विजय नायकल यांच्याशीही चर्चा केली. सर्व्हिस रोडवरील ही दुर्गंधी आणि कचरा लवकरात लवकर साफ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
“प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छता ही आमची प्राथमिकता आहे. केवळ कचरा उचलणे पुरेसे नसून, तिथे काम करणाऱ्या कष्टकरी कर्मचाऱ्यांना मानवी सोयी-सुविधा मिळणेही तितकेच गरजेचे आहे. प्रशासनाने यावर तातडीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.”
— अमोलभैय्या बालवडकर (नगरसेवक/स्थायी समिती सदस्य, पुणे मनपा)



More Stories
नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर