बालेवाडी :
बालेवाडी येथील मंत्रा मोनार्क सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. या सोहळ्यात सोसायटीतील लहान मुले, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वेशभूषा आणि फेटा परिधान करून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली. सोसायटीच्या स्वतःच्या ढोल-ताशांच्या पथकाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, वीरांगना हिरकणी व मावळ्यांच्या वेशात साकारलेल्या प्रतिमांसह ‘भव्यदिव्य’ अशी शौर्यपूर्ण मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात शिवजयंतीचा उत्साह आणि शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री बाबुराव आप्पा चांदेरे आणि श्री अमोल भैया बालवडकर यांनी प्रमुख उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित मान्यवरांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन समाजात एकात्मता, शिस्त आणि देशभक्तीची भावना जोपासण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंत्रा मोनार्क सांस्कृतिक समूह आणि सर्व रहिवाशांचे विशेष कौतुक करण्यात आले. एकत्र येऊन साजरी केलेली ही शिवजयंती सोसायटीतील सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ करणारी ठरली.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी