पुणे :
बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्र. ०९ मधील विविध प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी नगरसेवक श्री. बाबुराव आप्पा चांदेरे व नगरसेवक श्री. अमोलभैय्या बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष भेट घेतली. आगामी महापालिका अर्थसंकल्पात प्रभाग क्र. ०९ साठी आवश्यक तरतूद तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी परिसरातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. बाणेर-बालेवाडी, सुस-म्हाळुंगे, पाषाण आदी भागातील प्रलंबित मुख्य रस्ते पूर्ण करणे, मुख्य रस्त्यांलगत नवीन पदपथ उभारणे तसेच अपूर्ण पदपथ विकसित करणे या कामांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच पाषाण तलावाच्या पर्यटन विकासासाठी विशेष निधी, सुस-म्हाळुंगे परिसरातील ड्रेनेज लाईन, रस्ते व पथदिवे उभारणीसाठी तरतूद, बाणेर-बालेवाडी परिसरातील उद्याने व मैदाने विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही निवेदनात नमूद करण्यात आले.
परिसरातील वाढत्या स्वच्छता व दैनंदिन कचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर नवीन BRC गाड्या, घंटागाडी तसेच गार्डन वेस्ट वाहनांची उपलब्धता करून देण्याचीही मागणी करण्यात आली.
प्रभाग क्र. ०९ मधील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी