September 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल कोळवण शाखेत मातृ पितृ दिन उत्साहात साजरा

कोळवण :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या *पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल , कोळवण शाखेमध्ये शनिवार दिनांक *14 फेब्रुवारी 2026* रोजी * मातृ पितृ दिन साजरा झाला.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन *संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर* आणि *संचालिका रेखा बांदल मॅडम* यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

पेरीविंकल प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम* आणि *मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम* उपस्थित होत्या. आदरणीय शिवानी बांदल मॅम यानी आपल्या भाषणातून ह्या दिवसाची माहिती दिली.

मातृ-पितृ दिन अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आई-वडिलांप्रती आदर, प्रेम, कृतज्ञता आणि संस्कारांची जाणीव निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे पूजन करून त्यांना नम्र अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे पाय धुवून, पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी अनेक पालक व विद्यार्थी भावुक झाले.

विद्यार्थ्यांनी मातृ-पितृ महत्त्वावर आधारित लघुनाट्य सादर केली. पालकांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, नम्रता, कुटुंबमूल्ये आणि पालकांविषयी आदरभाव अधिक दृढ झाला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचा संचालिका /मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संचालिका शिवानी बांदल मॅडम* यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. शाळा प्रमुख मयुरी दोशी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. शेवटी सर्व पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

You may have missed