February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचा निर्धार..

बाणेर :

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर येथील माऊली गार्डन सोसायटीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी भेट देत रहिवाशांशी थेट व सुसंवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान परिसरातील दैनंदिन नागरी समस्या आणि विकासाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या संवादात पाणीपुरवठ्याची नियमितता, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, तसेच वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी याबाबत नागरिकांनी आपली मते व सूचना मांडल्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या सर्व प्रश्नांची दखल घेत लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा सौ. वैशालीताई कमाजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, कु. पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी उमेदवारांनी बाणेर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठीची आपली दृष्टी, प्राधान्यक्रम व आगामी कृती आराखडा नागरिकांसमोर मांडला. केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता विकासकामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका मांडत येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान माऊली गार्डन सोसायटीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या भेटीचे स्वागत करत आपले सक्रिय सहकार्य कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. नागरिकांच्या सहभागातून माऊली गार्डनसह संपूर्ण बाणेर परिसराचा सुयोग्य, सुरक्षित व नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी पारदर्शक, उत्तरदायी व लोकहितकेंद्रित कारभार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.