बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. गणेश कळमकर यांनी बालेवाडी येथील प्राइम पानचे तसेच बाणेर येथील अथाश्री व सप्तगिरी सोसायटी परिसरात भेट देत नागरिकांशी थेट व मनमोकळा जनसंवाद साधला.
या भेटीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला विश्वास, प्रेम व पाठिंबा व्यक्त केला. नागरिकांकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होत असल्याची भावना श्री. कळमकर यांनी व्यक्त केली. “जनतेचा आशीर्वाद हीच माझी खरी शिदोरी आहे,” असे सांगत त्यांनी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अथाश्री व सप्तगिरी सोसायटीतील संवादात नागरिकांनी मांडलेल्या समस्या, सूचना व अपेक्षा त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. “प्रभाग क्रमांक ०९ मधील प्रत्येक कुटुंबाचा विश्वास हीच माझी खरी ताकद असून, त्याच विश्वासाच्या बळावर विकासाची मजबूत आणि पारदर्शक वाटचाल सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या जनसंवादातून विकास, विश्वास आणि लोकसहभागाच्या माध्यमातून प्रभागात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी