March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुतारवाडीकरांचा सक्षम नेतृत्वाला आणि शाश्वत विकासालाच पाठिंबा, गणेश कळमकर आणि लहू बालवडकर यांचे जोरदार स्वागत..

सुतारवाडी :

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. लहू बालवडकर आणि श्री. गणेश कळमकर यांच्या प्रचारार्थ सुतारवाडी परिसरात आज भव्य जनसंवाद पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

पदयात्रेदरम्यान सुतारवाडीतील माता-भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले, तर अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत आपुलकी आणि विश्वास व्यक्त केला. सुतारवाडीच्या प्रत्येक गल्लीतून आणि घराघरातून मिळालेला प्रतिसाद हा केवळ राजकीय पाठिंबा नसून, गेल्या काही वर्षांतील कामावर नागरिकांनी दाखवलेल्या दृढ विश्वासाचे प्रतीक असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांनी दिलेले आशीर्वाद आणि तरुणांच्या डोळ्यांत दिसणारी प्रगतीची स्वप्ने ही सुतारवाडीला आदर्श, सुरक्षित आणि विकसित परिसर बनवण्याची प्रेरणा देणारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. निवडणूक म्हणजे केवळ सत्तेचा मार्ग नसून जनसेवेची मोठी जबाबदारी असल्याचेही उमेदवारांनी स्पष्ट केले.

सुतारवाडी व संपूर्ण प्रभाग क्रमांक ०९ च्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, आधुनिक ड्रेनेज व्यवस्था आणि नियोजित वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येणार आहे.

आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने स्वच्छ हवा, मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा, सुसज्ज नागरी आरोग्य केंद्रे तसेच नागरिकांसाठी अत्याधुनिक उद्याने विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. तसेच, प्रभागातील सुरक्षिततेसाठी प्रगत पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे विस्तृत जाळे उभारण्यात येणार असल्याचा विश्वासही देण्यात आला.

या जनसंवाद पदयात्रेत भाजपचे उमेदवार श्री. गणेश कळमकर, श्री. लहू बालवडकर यांच्यासह इतर उमेदवार आणि शेकडो समर्पित कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुतारवाडीच्या सर्वांगीण व संतुलित विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास यावेळी नागरिकांना देण्यात आला.