औंध :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ ड मधील अपक्ष उमेदवार महेश भिमराव सुतार यांनी निवडणूक प्रचाराचा वेळ वाढविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील मतदारसंख्या सुमारे १ लाख ५० हजारांच्या आसपास असून उपलब्ध प्रचार कालावधी अपुरा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. इतक्या मोठ्या मतदारसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत, मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचारास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महेश सुतार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे शहरातील बहुतांश प्रभागांची मतदारसंख्या सुमारे ८० हजारांच्या आसपास आहे. मात्र प्रभाग क्रमांक ९ हा त्याच्या जवळपास दुप्पट असल्याने, विशेषतः अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर अल्प कालावधीत प्रचार करणे कठीण ठरणार आहे.
या बाबींचा विचार करून निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रचाराचा वेळ वाढवून द्यावा, जेणेकरून सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, अशी विनंती त्यांनी केली आहे. आता निवडणूक प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे प्रभागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी