पाषाण :
सुस–बाणेर–पाषाण प्रभाग क्रमांक ९ ब मध्ये नागरिकांच्या नाराजीचा आवाज आता थेट निवडणूक रिंगणात उमटताना दिसत असून, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांना अपक्ष उमेदवार म्हणून “शिट्टी” हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी परिसरात तीव्र असंतोष पसरला होता. याच असंतोषातून निर्धार सभा घेण्यात आली, तर पाषाण ग्रामस्थांनी पाषाण बंद पुकारत आपली भूमिका ठामपणे मांडली होती.
या जनभावनेच्या पार्श्वभूमीवर प्रमोद निम्हण यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारल्याने प्रभागातील निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरणार आहे. अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार असून, नागरिक कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!