महाळुंगे :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमध्ये जनसामान्यांचा आश्वासक चेहरा म्हणून पुढे येत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक महिला उमेदवार सारिका अनिकेत मुरकुटे आणि मनसे नेते अनिकेत मुरकुटे यांनी आज म्हाळुंगे गावातील नागरिकांशी थेट संवाद साधला.
या जनसंवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या विविध नागरी प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, ड्रेनेज तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. या सर्व मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत उपाययोजनांची स्पष्ट दिशा सारिका मुरकुटे यांनी मांडली.
जनसंवादातून त्या केवळ आक्रमकच नव्हे तर अभ्यासू आणि संवेदनशील उमेदवार असल्याची झलक नागरिकांना अनुभवायला मिळाली. मनसेच्या चेहऱ्याप्रमाणे आक्रमकता आणि विषयाची जाण यांचा प्रभावी समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून आला, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांशी थेट संवाद, समस्यांचे गांभीर्याने ऐकून घेणे आणि ठोस उपायांची मांडणी यामुळे प्रभाग क्रमांक नऊमध्ये सारिका मुरकुटे यांची उमेदवारी अधिक भक्कम होत असल्याचे चित्र या संवादातून स्पष्ट झाले.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी