बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रचार दौरा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संदीप बालवडकर आणि जयेश मुरकुटे यांनी विविध सोसायट्यांमध्ये नागरिकांसोबत बैठकांचे आयोजन केले. या बैठकींमधून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाबाबत चर्चा केली.
या चर्चेदरम्यान सोसायटीतील नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत प्रभागात बदलाची गरज असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. नियोजनबद्ध विकास, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणारा सुशिक्षित व सक्षम उमेदवार मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
नेते संदीप बालवडकर आणि जयेश मुरकुटे यांनी नागरिकांच्या सूचनांची व समस्यांची नोंद घेत, प्रभागाच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. नागरिकांशी झालेला हा थेट संवाद आगामी निवडणुकीत परिवर्तनाचा संकेत देणारा ठरत असल्याचे चित्र या बैठकीतून दिसून आले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी