बोपोडी :
सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने बोपोडीतील सर्वे नंबर २६ येथील SRA बिल्डिंगजवळ “सन्मान नारीशक्तीचा – खेळ रंगला पैठणीचा” या अभिनव व आनंददायी सोहळ्याचे आयोजन काल करण्यात आले. महिलांच्या सन्मान, सहभाग आणि आनंदाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील माता-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई (रमेश परदेशी) यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सोहळ्याच्या माध्यमातून परिसरातील महिलांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सनी निम्हण म्हणाले की, “दैनंदिन व्यस्त जीवनातून वेळ काढून महिलांनी या सोहळ्याचा आनंद घेतला, हे पाहून अत्यंत समाधान वाटले. जसे आपण आपल्या कुटुंबासाठी समर्पित भावनेने काम करतो, तसेच औंध–बोपोडी परिसरासाठीही मी समर्पित भावनेने कार्यरत आहे. महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना नव्या उंचीवर नेण्याचा माझा मानस असून, त्यासाठी सर्वांचे बळ व आशीर्वाद आवश्यक आहेत.”
कार्यक्रमात पैठणी खेळ, मनोरंजनात्मक उपक्रम आणि महिलांसाठी खास आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम आनंदी, उत्साही आणि महिलांच्या सन्मानाला अधोरेखित करणारा ठरला. सोमेश्वर फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी