बाणेर :
भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाचे सरचिटणीस सचिन दळवी व नेत्या लक्ष्मी सचिन दळवी यांनी बाणेर परिसरात ‘संवाद आपुलकीचा’ अभियानांतर्गत नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीचे मुद्दे जाणून घेतले.
नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर उपाययोजना करण्यासंबंधीची चर्चा यावेळी उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडली. वाहतूक कोंडी, रस्त्यांची देखभाल, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सोयीसुविधा आदी महत्त्वाच्या नागरी प्रश्नांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने मत मांडले.
या संवादादरम्यान सचिन दळवी यांनी नागरिकांना खात्री दिली की, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी ठोस पुढाकार घेतला जाईल. तसेच विविध शासकीय कार्यालयांशी समन्वय साधत प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती पावले उचलली जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
लक्ष्मी सचिन दळवी यांनीही परिसरातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत सामाजिक सहभाग वाढविण्यावर भर दिला. त्या म्हणाल्या की, बदलाची प्रक्रिया लोकसहभागातूनच वेगाने पुढे जाते आणि नागरिकांनी या उपक्रमात सक्रियपणे सहभागी व्हावे.
नागरिक-विकास संवादाच्या माध्यमातून आयोजित हा कार्यक्रम यशस्वी ठरला असून पुढील काही दिवसांमध्ये परिसरातील इतर भागांमध्येही अशा भेटी घेण्यात येणार आहेत. बाणेर परिसराच्या विकासासाठी हा संवाद महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी