बाणेर :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज धनकुडे फार्म, बाणेर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे-सुतारवाडी तसेच पाषाण या भागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात आगामी निवडणूक प्रचाराची दिशा, नियोजन, रणनिती आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार कसा अधिक परिणामकारक करता येईल, यावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली. स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढण्याबरोबरच नागरिकांपर्यंत पक्षाचा विचार प्रभावीपणे पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, सरला बाबुराव चांदेरे, ज्योती राहुल बालवडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह नव्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून मेळाव्याला उत्साहाचे स्वरूप दिले.
प्रचाराच्या शुभारंभाच्या पूर्वसंध्येला सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने, जोमाने आणि निष्ठेने प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभागातील सर्वांगीण विकासाची दिशा आणि उमेदवाराची भूमिका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.
उपस्थिती, नियोजन आणि सकारात्मक उर्जेने भरलेला हा मेळावा आगामी निवडणूक प्रचाराचा प्रभावी प्रारंभ असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.








More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!