पाषाण :
सुस खिंड येथील तीव्र चढ असलेल्या आणि धोकादायक ठरत असलेल्या रस्त्यावरून R.M.C मिक्सर ट्रकना येण्या-जाण्यास अखेर बंदी घालण्यात आली असून, या मागणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवदूत महेश भिमराव सुतार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यश मिळाले आहे.
सदर रस्त्यावरून जाणाऱ्या R.M.C गाड्यांमधून खडी माल वारंवार रस्त्यावर सांडत होता. पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी वारंवार साफसफाई करत असूनही R.M.C वाहनांची संख्या अधिक असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी जमा होत होती. त्यामुळे हा रस्ता नेहमीच घसरडा व वाहतुकीस धोकादायक बनत होता.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महेश सुतार शिवदूत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी R.M.C गाड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना 2-3 वेळा पत्रव्यवहाराद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून दिली.
आज पुन्हा महेश सुतार शिवदूत आणि शाखा संघटक सूरज चोरमले यांनी आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत आयुक्तांनी मागणी मान्य करत पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. तसेच त्या रस्त्यावर हाइट बॅरिअर बसविण्याची मान्यताही दिली आहे.
या निर्णयामुळे सुस खिंड रस्त्यावर खडी साचण्याचा व अपघातांचा धोका कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यामुळे यश मिळाले आहे.



More Stories
*बावधन च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोनक टोयोटाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न!!!*
*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा*
“वीज सडक पाणी” प्रश्न, बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने मांडला महाराष्ट्राच्या मंत्रालयात.