September 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

म्हाळुंगे : पुराणिक सोसायटीतील बॅडमिंटन कोर्टचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन

म्हाळुंगे : 

म्हाळुंगे येथील पुराणिक सोसायटीमध्ये बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन आज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. सोसायटीतील सर्वच रहिवाशांसाठी, विशेषत: अबालवृद्धांसाठी क्रीडा आणि आरोग्य साधनेसाठी एक उत्तम सुविधा म्हणून हे कोर्ट आता उपलब्ध झाले आहे.

आधुनिक तांत्रिक सुविधांनी सज्ज असलेले हे बॅडमिंटन कोर्ट सोसायटीतील क्रीडा-संस्कृतीला नवी दिशा देणारे ठरणार आहे. नियमित व्यायाम, खेळ आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा असल्याचे रहिवाशांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमादरम्यान विविध क्रीडा उपक्रमांविषयी रहिवाशांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली.

या प्रसंगी समीर चांदेरे, युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे शहर यांनी उपस्थित राहून सोसायटीतील रहिवाशांचे कौतुक केले. “पुराणिक सोसायटीने आपल्या परिसरात क्रीडासंस्कृती जोपासण्यासाठी घेतलेली ही पुढाकार प्रशंसनीय असून समाजातील सर्व वयोगटासाठी प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध झाल्याने सोसायटीतील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नियमित क्रीडा उपक्रमांना आता नवी गती मिळणार आहे.

 

You may have missed