पाषाण :
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात यंदा भव्य प्रतिसाद मिळाला. रोमांचक अंतिम सामन्यात ईगल वॉरियर संघाने प्रभावी खेळ करत विजेतेपद पटकावले, तर स्काय इलेव्हनने उपविजेतेपद मिळवले.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून निखिल अरगडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ऋषिकेश सुतार तर सामनावीर म्हणून ऋषिकेश निम्हण यांना गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाला शिवसेना पुणे शहर प्रमुख गजाननजी थरकुडे, ज्येष्ठ शिवसैनिक वाडेश्वर सुतार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप रणपिसे, महिला उपशहर संघटिका ज्योतीताई चांदेरे, युवा सेना उपशहर प्रमुख मयूर भांडे, तसेच अशोक दळवी, स्वातीताई रणपिसे, सुनीताताई रानवडे, महेश सुतार, विजय दाभाडे, अमोल फाले, रोहित लोंढे, सुरज चोरमुले, शशिकांत सुतार, शाम सुतार, सुखदेव जगदाळे आणि परिसरातील अनेक क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शिवसेना कोथरूड विधानसभा विभाग प्रमुख संतोष तोंडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!