सूस :
सुस–म्हाळुंगे हद्दीतील विबगोयर शाळा ते पिनाकल निलांचन सोसायटीदरम्यानच्या अत्यंत महत्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.
अनेक वर्षांपासून नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळा ठरणारा हा महत्त्वाचा मार्ग आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिक सुरक्षित, गुळगुळीत आणि टिकाऊ स्वरूपात सुधारला जात आहे. या कामामुळे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीचा वेग आणि सुसूत्रता वाढण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आदरणीय बाबुरावजी चांदेरे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनाचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह रस्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
नवीन डांबरीकरणामुळे परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल. विद्यार्थ्यांपासून कार्यालयीन कर्मचारी तसेच दैनंदिन प्रवासी या सर्वांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा लाभ होणार आहे.
या कामाबाबत समाधान व्यक्त करत समीर चांदेरे यांनी सांगितले की, “या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या अडचणींवर मोठ्या प्रमाणात उपाय होईल. हा उपक्रम लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा आहे.”





























More Stories
*‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार*
लोकशाही संस्कारांचा अनोखा उपक्रम; विद्यापीठ हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?