सुतारवाडी :
प्रभाग क्र. ९ अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुतारवाडी शाखेच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान बचाव कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवदूत महेश सुतार यांनी केले होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जेष्ठ नागरिकांना संविधान पुस्तिका वाटून त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना राज्य संघटक बाळासाहेब भांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “संविधान दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर नागरिक म्हणून आपली जबाबदारी अधोरेखित करण्याचा क्षण आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये दैनंदिन जीवनात जपणे आणि राष्ट्राच्या प्रगतीत सक्रिय योगदान देणे हीच संविधानाप्रती खरी कृतज्ञता आहे.”
कार्यक्रमाचे वक्ते संविधान अभ्यासक चिंतामन जाधव यांनी समता मूल्ये आणि संविधानिक कर्तव्यांवर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती :
• शिवसेना युवा उपशहर प्रमुख मयुर भांडे (सरपंच)
• शाखाप्रमुख अमोल फाले
• प्रसिद्धी प्रमुख करण कांबळे
• सा. डिके लालसरे, नारायण जाधव, सुहास जाधव, नंदू भाऊ, सुरज चोरमले (शाखा संघटक)
• राहुल काकडे, टायगर ग्रुपचे जालिंदर गायकवाड
• अजिंक्य रणपिसे, विक्रम बावणगड
• शिवसैनिक रुपालीताई सुतार
तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी करण कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी