बाणेर :
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील सर्व सोसायट्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा जागर निर्माण करण्यासाठी “स्वच्छ सुंदर पर्यावरणपूरक आपली सोसायटी स्पर्धा 2025” ची घोषणा करण्यात आली आहे.
ही स्पर्धा मा. नगरसेवक पुणे महानगरपालिका श्री. प्रमोद आण्णा निम्हण आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यध्यक्ष सौ. पुनम विशाल विधाते यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केली असून स्थानिक स्तरावर स्वच्छता, हरित उपक्रम आणि पर्यावरणपूरक पद्धतींचे प्रोत्साहन देण्याचा त्यामागील उद्देश आहे.
🌱 स्पर्धेचा उद्देश
परिसर स्वच्छ, हरित आणि सौंदर्यपूर्ण ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक कुटुंब व सोसायटीला प्रोत्साहन देणे. पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग वाढवणे.
🏆 पारितोषिके
• प्रथम क्रमांक: ₹2,00,000/-
• द्वितीय क्रमांक: ₹1,00,000/-
• तृतीय क्रमांक: ₹50,000/-
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक सोसायट्यांनी दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी.
संपर्क: 9607454500
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf_8AeJ-hOVWvIxcFjUIY4cVnblbcDTE3C-CyybcguP_-05ig/viewform?usp=sharing&ouid=116778363226355418832
नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पुणे घडविण्याच्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी