बाणेर :
बाणेर परिसरातील कल्पतरू जेड सोसायटी मधील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत होता. अखेर नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या पुढाकारातून या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे.
आज नवीन पाण्याच्या लाईनचे भूमिपूजन सोसायटी परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी पुणे महानगरपालिकेचे माननीय स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्यांच्यासोबत मा. नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, मा. नगरसेविका रोहिणी ताई चिमटे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांची उपस्थिती होती.
नवीन जलवाहिनीमुळे कल्पतरू जेड सोसायटीतील पाण्याचा तुटवडा पूर्णपणे दूर होणार असून, रहिवाशांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येवर अखेर तोडगा निघाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील मूलभूत सुविधा अधिक बळकट होणार असून, रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!