बाणेर :
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त बाणेर येथे भाजप नेते विशाल गांधिले यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने बाणेर–सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी आणि बालेवाडी परिसरातून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. घोषणाबाजी आणि युवा ऊर्जा यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. रॅलीचा समारोप भाजप नेते विशाल गांधिले यांच्या कार्यालयासमोर झाला. येथे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाला महेंद्र पाटील, समीर चाकणकर, निसर्ग गांधिले, प्रसाद पिड्डे, इंद्रजित दुधगोंडे, तानाजी दराडे, बालाजी मुळे, सुनील दराडे, ऋषी गांगुर्डे, नितीन काळे तसेच परिसरातील अनेक युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.




























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम