बालेवाडी :
“आपण राहतोय तो परिसर स्वच्छ असायला हवा!” — हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो, पण आता तो फक्त विचार न राहता कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे. स्वच्छ परिसर ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक सवय आहे. आणि ही सवय अंगीकारण्यासाठी “मिशन निर्मल” उपक्रमाच्या माध्यमातून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपल्या परिसरातील गल्ली-बोळ, सोसायटी परिसर, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या भागात “मिशन निर्मल” अभियान राबवायचे असल्यास नागरिकांनी आपले नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर हे 8380088686 या क्रमांकावर फक्त WhatsApp द्वारे पाठवावे.
“आपण सांगायचं, आम्ही स्वच्छ करायचं!” — या घोषवाक्याने प्रेरित हा उपक्रम बाणेर, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो.
माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पुढाकारातून सुरु झालेलं “मिशन निर्मल” अभियान हे फक्त स्वच्छतेपुरतं नाही, तर स्वच्छतेची सवय आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव निर्माण करण्यासाठी एक चळवळ बनत आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी