February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

“आपुलकीची दिवाळी, मराठवाड्यासाठी” — १५ हजार कुटुंबांना अमोल बालवडकर यांच्या वतीने दिवाळी सरंजाम वाटप.. समाजबंध दृढ करणारा उपक्रम; ‘आपला मराठवाडा सेवा संघ’चा शुभारंभ

बालेवाडी :

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील मराठवाड्यातील कष्टकरी, कामगार बांधव तसेच पूरग्रस्त कुटुंबांची दिवाळी आनंदमयी व्हावी या हेतूने “आपुलकीची दिवाळी, मराठवाड्यासाठी” या उपक्रमांतर्गत सुमारे १५,००० कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणारा हा उपक्रम बाणेर परिसरात उत्साहात पार पडला.

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या “सण साजरा करताना सामाजिक जबाबदारी विसरू नका” या संदेशाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने ‘आपला मराठवाडा सेवा संघ’ या संस्थेचा शुभारंभही करण्यात आला. या संस्थेमार्फत आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित राहून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “अमोल बालवडकर यांनी ‘आपला मराठवाडा सेवा संघ’ उभारून मराठवाड्याच्या नागरिकांसाठी स्थायी व्यासपीठ निर्माण केले आहे. हा उपक्रम समाजातील संवेदनशीलतेचे प्रतीक आहे.”

माजी केंद्रीय मंत्री मा. रावसाहेब दानवे पाटील म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून अमोल बालवडकर हे १५ हजारांहून अधिक कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करत आहेत. हे त्यांच्या समाजाशी असलेल्या घट्ट नात्याचे दर्शन घडवते.”

सदर कार्यक्रमाला १५ हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती लाभली. सामाजिक भान, जनसंपर्क आणि जनसेवा या तिन्ही स्तरांवर या उपक्रमाने एक नवा आदर्श निर्माण केला.

अमोलभैय्या बालवडकर यांनी सांगितले, “राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित नसून, लोकांच्या संकटात त्यांच्या सोबत उभे राहणे हीच खरी जनसेवा आहे. ‘आपुलकीची दिवाळी, मराठवाड्यासाठी’ हा त्याच विचाराचा विस्तार आहे.”

या कार्यक्रमाला मा. चंद्रकांतदादा पाटील, मा. रावसाहेब दानवे पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, रतन बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, किरण दगडे, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, स्वप्नालीताई सायकर, ज्योतीताई कळमकर, गणेश कळमकर, लहूशेठ बालवडकर, तसेच अमोल बालवडकर फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी भागातील मान्यवर उपस्थित होते.