बावधन :
बावधन येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज तर्फे, 16 ऑक्टोबर रोजी, “दीपझंकार २०२५” हा दिवाळीपूर्व संगीतमय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या विशेष प्रसंगी इंडियन आयडॉल फेम सुरेश कदम या मान्यवर अतिथी गायकांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच NKGSB बँकेचे श्री वल्लभ सर यांच्या समवेत संस्थेचे संस्थापक माननीय राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल व संदीप ढमढेरे यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवली.
विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनीही या संगीतमय सोहळ्यात उस्फुर्त सहभाग घेत, आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. सर्वांनी मिळून दिवाळीचा आनंद, एकता आणि संस्कृतीचा सुंदर संगम साधला.
या कार्यक्रमात पालकांसाठी आकर्षक फूड स्टॉल्सही लावण्यात आले होते. स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि मनमोहक सजावटीमुळे वातावरण आनंदमय झाले. सर्व तिकीटांचे बुकिंग पूर्णपणे झाले असून, पालकांनी या कार्यक्रमाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.
✨ “दिवा तेवत राहतो कारण तो स्वतःला वितळवतो; तशीच माणसंही जग उजळवतात आपल्या कार्याने.” ✨
🌸 “या दीपोत्सवात आनंद, प्रेम आणि मैत्रीचे दिवे प्रत्येक मनात प्रज्वलित होवोत!” असे प्रतिपादन करत संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सर्वांनी बुद्धिबळासारखे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे असे सांगून बुद्धिबळातील प्रत्येक घराचा जीवनाशी असलेला पूरक संबंध त्यांच्या भाषणातून अतिशय कल्पकतेने सांगितला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, आणि कु. शिवानी बांदल तसेच निर्मल पंडित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांचे अचूक नियोजन व सुसूत्रता या सर्व बाबींमुळे कार्यक्रम रंगतदार व नियोजनबध्द झाला. कार्यक्रमाचे समन्वयन कु. सयाली गायकवाड (H.O.D.) आणि सौ. शिरीन काझी – समन्वयिका यांनी कुशलतेने केले.
सुत्रसंचालन – राम जोगदंडे आणि वैशाली कुलकर्णी यांनी प्रभावीपणे पार पाडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृशाली ब्रह्मे, अक्षय कबाडे, सुरज साठे तसेच सर्व शिक्षकवर्ग व सर्व कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले.
अशा या “दीपझंकार २०२५” कार्यक्रमाने दिवाळीच्या आगमनाचे स्वागत संगीत, संस्कृती आणि आनंदाने करत शाळेचा परिसर प्रकाशमान केला. कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!