पाषाण :
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘दिवाळी धमाका’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक १७ ऑक्टोबर, शुक्रवार रोजी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी प्रशालेच्या संचालिका आदरणीय शिवानी बांदल, आदरणीय रेखा बांदल, मुख्याध्यापिका वीणा कदम आणि पर्यवेक्षिका नेत्रा काकडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रशालेचे संस्थापक आदरणीय राजेंद्र बांदल सर यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सण साजरा करताना एकात्मतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी रांगोळी, पणती सजावट, गायन आणि नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली सांस्कृतिक सादरीकरणे तसेच विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे प्रमुख आकर्षण ठरले. संचालिका शिवानी बांदल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्त्व आणि परंपरेचे मूल्य समजावून सांगितले.
शेवटी संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिठाई देऊन सणाचा आनंद साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, आनंद आणि संस्कारमय वातावरणात पार पडला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!